जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून लपून बसलेल्या जयदीप आपटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कुटुंबीयांना भेटायला आलेले असताना जयदीप आपटेंना अटक करण्यात आली असून त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

जयदीप आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामिनाची तयारी ८ दिवसापासून सुरू होती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून लपून बसलेल्या जयदीप आपटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कुटुंबीयांना भेटायला आलेले असताना जयदीप आपटेंना अटक करण्यात आली असून त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. जयदीप आपटे हे शिल्पकार आहे. सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याने हा पुतळा पडल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. जयदीप आपटेंच्या जामिनाच्या ठाण्यातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत हे गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, जयदीप आपटे सारखा एक माणूस, मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे. ती शक्ती मंत्रालयात आहे ती शक्त वर्षा बंगल्यावर आहे मालवणात आहेत. त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकले. पण अखेर शिवभक्त यांचा दबाव आणि रेटा होता की त्याला त्याचे बॉस वाचवू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. जयदीप आपटे यांच्यापेक्षा ज्याने त्यांना हे काम दिलं ते बेकायदेशीर होतं. ते सूत्रधार आजही सरकार मध्ये आहेत. त्यांच्यावरती कारवाई कधी होणार ?आणि जयदीप आपटेला अटक होण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू होती. आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हालत होते, मी वारंवार ठाण्याच्या उल्लेख करत आहे. जयदीप आपटे दोन दिवसात सरेंडर होतील आणि त्यांच्या बाबतीत जामीनाबाबत हालचाली सुरू करा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बाजार मांडला आणि केला त्या सर्वांचे आहे षडयंत्र जे आहे त्याचे सूत्रधार ठाण्यामध्ये आहेत. लहान मोठे मासे यात प्रश्न नाही. आम्ही राजकारण करू इच्छित नाही असं यावेळी राऊत म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी झाला या संपूर्ण कामात भ्रष्टाचार झालेला आहे. आमचा विरोध आणि लढा त्यासाठी. कोट्यावधी रुपयाचा काम टेंडर माध्यमातून काढल प्रत्यक्ष काम २०-२५ लाखात काढलं. पुतळा जो आहे मंजूर झालेला असेल आणि झालेला काम जी तफावत झाली म्हणून तो पुतळा कमी प्रतीचा झाला. मुख्यमंत्री म्हणतात ४५ किलोमीटर ताशी वेगाने पडला. हे जे सरकार आहे ते महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार करतात. छत्रपती शिवाजी महाराज नावाने लूट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र लुटला जात आहे असं यावेळी राऊत म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहे. काल आम्ही दौऱ्याला गेलो ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले. तिकडे तरुण कार्यकर्ते यांची घरे, शाळा, गुरं, माणसं वाहून गेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यातील काम सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले. सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरात मधील आहे. आता परभणीतल्या रस्त्यातील काम या ठेकेदारांना हिंगोली मधील रस्त्याचे काम या ठेकेदारांना महाराष्ट्रात तरुण मुलं नाही आहेत का? महाराष्ट्रात इंजिनियर्स नाही आहेत का जे हे काम करू शकतील का? आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः आणि आमचे अनेक पदाधिकारी फिरत होतो. अवस्था खूप गंभीर आहे दुष्काळात सर्व काही वाहून गेले आहे अजून सरकारने पंचनामे केलेले नाही.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version