spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुंभमळ्यापूर्वीच नाशिक महानगरपालिका आणि साधू महंतांमध्ये वाद रंगला

सध्या कुंभमळ्यापूर्वीच नाशिक महानगरपालिका आणि साधू महंतांमध्ये वाद पेटून उठल्याचे दिसून येत आहे. कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पूर्वी नाशिक मध्ये (Nashik) वादा (dispute)चा आखाडा रंगला असून कुंभमेळासाठी भूसंपादन कोणी करायचं यावरून नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) आणि राज्य सरकार (State Government) या दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे या दोन्हींच्या वादामुळे साधू महंतांमध्ये नाराजी असून अमित शाह (Amit Shah), पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) साकडे घालणार असल्याचे महंतांकडून सांगण्यात येत आहे.

दर बारा वर्षांनी नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर आता पासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. कुंभमेळा आयोजनासाठी महापालिकेला भूसंपादन आणि आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र २५० एकर क्षेत्राचा भूसंपादन करण्यास महानगरपालिकेने (Nashik NMC) असमर्थता दर्शवली असून कुंभमेळा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून राज्य आणि केंद्र सरकारने भूसंपादन करावं अशी मागणी करत केली आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शासनाच्या कोर्टात कुंभमेळ्याचा चेंडू टोलवला आहे. यासंदर्भात दोन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावं असं सल्ला साधू महंताकडून दिला जात आहे.

कुंभमेळ्यासंदर्भांत राज्य शासनाचे आदेश होते कि कृती आराखडा तयार करा, भूसंपादन करा आणि कामाला लागा, मात्र आता वादाचा आखाडा रंगलेला आहे. त्यामुळे साधू महंतांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. साधारणतः २५० एकर जमीन तपोवन परिसरात आहे. मात्र ही जमीन कोणी आरक्षित करावी? भूसंपादक कोणी करावं यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये आता सुरू टोलवाटोलवी झाली आहे. दर कुंभमेळ्याच्या वेळी एखादा वाद निर्माण होतो. यंत्रणा काम करत नाही का? नेहमीच्या वादावर उपाय काय? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट, प्रेक्षक भावुक म्हणाले, आमच्यासाठी तूच

The Kashmir Files चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे अनुपम खेर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss