spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दहिसर येथे प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं खळबळ!

दहिसर (Dahisar Crime News) पूर्व इथं हायवेवर एका बेस्ट बसवर (Dahisar Best Bus) दगडफेक करण्यात आली. काही उनाड तरुणांनी बेस्ट बसवर (BEST Bus) दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना समोर आली आहे.

दहिसर (Dahisar Crime News) पूर्व इथं हायवेवर एका बेस्ट बसवर (Dahisar Best Bus) दगडफेक करण्यात आली. काही उनाड तरुणांनी बेस्ट बसवर (BEST Bus) दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हॉटेल पायलजवळ हा प्रकार घडला. या दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचंही समजतं. तसंच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दहिसर चेक नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसवर या तरुणांनी सोमवारी दि १४ नोव्हेंबर रोजी रात्री दगडफेक केली. या तरुणांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु झालं आहे.

मुंबईतील दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पायल हॉटेल आहे. या हॉटेलजवळ बेस्ट बसची एका कारला किरकोळ धडक बसली. त्यातून गाडीतील लोकांनी आपल्या साथीदारांना बोलवलं आणि भर रस्त्यात बसवर दगडफेक केली. ज्या बसवर ही दगडफेक करण्यात आली, ती बस दहिसर चेक नाक्याकडे जात होती. त्यावेळी बेस्ट बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला. अपघातातून झालेल्या बाचाबाचीनंतर ही दगडफेक करण्यात आली. कारमधील प्रवाशांनी आपल्या साथीदारांना बोलावून बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. यात अनेक प्रवासी जखमीही झाले. दगडफेक कऱण्यात आलेली बस 705 क्रमांकाची होती. दगडफेकीमध्ये बसचं मोठं नुकसान झालं. बसच्या खिडकीच्या काचा दगडफेकीमध्ये फुटल्या. तर बसच्या समोरील काचेचंही दगडफेकीमध्ये प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या दगडफेकीदरम्यान, बेस्ट मधील प्रवासी प्रचंड धास्तावले होते. दहिसरमध्ये झालेल्या या दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यात आता या घटनेची पोलिसांनीही गंभीर दखल घेतलीय. सध्या दगडफेकीबाबत स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.

पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील स्टेशन परिसरात रविवारी (१३ नोव्हेंबर) समोर आली होती. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये वाद झाला होता आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली. त्यानंतर वाहकाने हा प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे..

हे ही वाचा :

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवरने बाधित बालकाचा मृत्यू

राशी भविष्य १५ नोव्हेंबर २०२२, आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss