spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive: आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही राणेंची सवय, भास्कर जाधवांची टीका

कोकणातला रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदार संघ खूपच संवेदनक्षम आहे. भास्कर जाधव-नारायण राणे यांच्यातील संघर्षाने परिसीमा गाठली आहे. पोलीसांनी सुमारे ४०० कार्यकर्त्यांविरूध्द तक्रारी दाखल केल्यात. त्यामुळे येत्या निवडणूकीपर्यंत ही धुमस कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात निवडुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यानंतर लोकसभेच्या निवडुकांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, किंबहुना याआधी काही चर्चा सुरु होत्या, त्या चर्चांना आता शब्दरुप प्राप्त झाले आहे. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली का? या प्रश्नावरून सध्या गदारोळ माजला आहे. याबद्दलचं आमदार भास्कर जाधव यांच्याशी टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी संवाद साधला आहे. त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट.

महाराष्ट्रातलं प्रत्येक मतदान स्वतःच वेगळेपण जपत असतं. काझी दिवसांपूर्वी एक राडा झाला, त्या राड्यामध्ये तुम्ही होतात. राणेंसोबत तुमचं जुनं वैर होतं, असं असलं तरीही काही माहिती समोर येत आहे, की पोलिसांनी ४०० लोकांवर तक्रारी करायला सुरुवात केलीये. तर नेमकं काय घडलं होतं? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारला असता, ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस निलेश राणे यांच्या ३-४ वर्षांतील मुलाखती आणि भाषणे काढून पाहिली तर आपल्याला त्यांची भाषा लक्षात येईल. मला जरी आक्रमक किंवा मुरलेला आहे असं म्हटलं जात असलं तरीही इतक्या वर्षात मी कोणाच्याही लेकी-बाळींना, कोणाच्याही सासू-सुनांना, कोणत्याही महिलेला वाईट असं बोललेलो नाही. वाईट वक्तव्य केलं नाही. एक लक्षात घ्या, मला शब्दांत पकडणे कठीण आहे. मी कोणालाही नेपाळी बोललेलो नाही. मी बोललो होतो की, नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो तो.. असं मी म्हणालो होतो. मी राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत काही बोलायचं नाही असं ठरवून त्यांना बेदखल केलेलं आहे. राणेंच्या कोणत्याच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. गुन्हे दाखल झाले ते व्यक्ती आमचे होते. माझ्या ४० ते ४२ वर्षांच्या संघर्षात मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. मला तुरुंगात जायला लागलं तरीही मी गेलो.आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही राणेंची सवय आहे. असा हल्लाबोल यावेळी भास्कर जाधव यांनी केला.

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अमित शाह यांना भेटले का? यावर भास्कर जाधव म्हणाले की, २०१९ साली अमित शाह मातोश्रीवर गेले होते, इतकं मला माहिती आहे. बाकी आता रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अमित शाह यांना भेटले की नाही, याची मला काही कल्पना नाही. भाजपला महाराष्ट्राचा पेपर कठीण जातोय का? असा प्रश्न विचारला असता, भास्कर जाधव म्हणाले की, महाराष्ट्राचा पेपर भाजपला फक्त कठीण जाणार नाही, तर भाजप सपशेल नापास होणार आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमानी राज्य आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर तसेच महात्मा फुलेंच्या विचारांचा आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ माँ यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न अनेकांनी केल्याचा इतिहास आहे. जो जो महाराष्ट्राला नामोहरम करण्याचा प्रयत्न करेल, तो तो नामोहरम होईल. असे मत टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांच्याशी संवाद साधतांना आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

हा प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ । Ashish Shelar | PM Narendra Modi Pankaja Munde या लोकसभा निवडणूक लढणार की नाही…, पहिली प्रतिक्रिया आली समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss