कमी पाण्यात एकाचवेळी तिहेरी पिकांचा प्रयोग, शेतकऱ्याची यशस्वी शेती

कमी पाण्यात एकाचवेळी तिहेरी पिकांचा प्रयोग, शेतकऱ्याची यशस्वी शेती

शेतकरी शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत. या माध्यातून चांगले उत्पन्न घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील प्रगतिशील शेतकरी रमेश बाफना या शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांने आपल्या शेतात तिहेरी पिक पध्दतींचा अवलंब करून त्यांनी तो प्रयोग यशस्वीपणे पिकाची लागवड केली असून त्यातील मका हे पिक आता काढणीला आले आहे. पीक चांगल्या अवस्थेत आहे व यातून चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे. कमीत कमी पाण्यात एकाच वेळी तिहेरी मिश्र पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

रमेश बाफना यांनी आपल्या शेतात ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी आपल्या एकर शेतीमध्ये एकाच वेळी तिहेरी पिक पध्दतींचा अवलंब करून त्यांनी मिश्र शेती करीत एकाच वेळी तिहेरी पिकांचे उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा तिहेरी पिकाला उपयोग करून पाण्याची बचत केली.या आगळावेगळा असा प्रयोग शेतकऱ्यांपुढे, आदर्श निर्माण केला आहे. प्रयोगशील शेती करून रमेश बाफना यांनी रासायनिक खताला तिलांजली दिली.

सेंद्रिय खते व शेणखताचा शंभर टक्के वापर करून मिश्र पिके घेत अधिकचे उत्पन्न मिळविता येते. यामुळे शेतीही नफ्यात आली. सेंद्रिय खते व ठिबक सिंचनावर मिश्र पिके घेऊन अधिक उत्पन्न घेतल्याने शेती नफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग केला, यामुळे वेळ आणि पैशांची बचत झाली. यातून भरघोस उत्पन्न मिळाले.

यामध्ये मका,सुबाभुळ,तुर,या पिकांची निवड केली आहे. शेतात तिहेरी पिकांचे नियोजन करुन एकाच वेळी तिन्ही पिकांचे उत्पादन खर्च कमी करून त्यांनी भरघोस उत्पन्न घेण्याचा मार्ग निवडला असुन तो त्यांनी यशस्वीरीत्या करत आहेत. तिहेरी पिका पैकी आता मका या पिकांचे उत्पादन हाती येणार आहे. त्यांनतर तुर व शेवटी सुबाभुळ चे उत्पादन मिळणार आहे. तिहेरी पिकांचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने उत्पन्न शेतकरी रमेश बाफना हे घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version