सीटबेल्ट संदर्भात मुदतवाढ, तुर्तास समज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार कारवाई

सीटबेल्ट संदर्भात मुदतवाढ, तुर्तास समज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार कारवाई

सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांनी दिले आहेत.

मुंबईत अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिला जाणार आहे. सीटबेल्टकरता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिस यांनी दिले आहेत. सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे अशी माहिती देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत मुंबईत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवाशांनी प्रवास करताना सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले. कोणतीही घोषणा न करता थेट अंमलबजावणी केल्यास चालकांचा रोष सहन करावा लागण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी याबाबत १४ ऑक्टोबरलाच घोषणा केली.

वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम सीट बेल्टच्या कारवाईबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ट्रॅफिक युनिटला दहा दिवस वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले आहे. दहा दिवसांनंतर चालक आणि मागे बसलेले प्रवासी सीटबेल्टशिवाय आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना बहुतांश टॅक्सीत सीट बेल्ट लावलेले आढळले नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यापेक्षा जनजागृती करणे खूप महत्त्वाचे होते.मात्र, वाहतूक पोलिस आणि वाहनधारकांमध्ये रस्त्यावर गोंधळ होऊ नये. म्हणून वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथम जनजागृती करण्याचे ठरवले आहे. ११ नोव्हेंबर पासून दंडात्मक कारवाई सुरवात होणार आहे.

हे ही वाचा :

अमरावतीमध्ये बचू कडूंचा जाहीर मेळावा; मेळावा स्थळी झळकले ‘मै झुकेगा नही’ चे बॅनर

राशी भविष्य -१ नोव्हेंबर- बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version