टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस तरुणाच्या आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण वाढत आहेत. अशातच नाशिक शहरातील महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये (Hostel Suicide) एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने महाविद्यालयासह वसतिगृह परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अल्पवयीन तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे नागरिकांसह पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या KTHM या नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये टी वाय बी कॉम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. गौरव रमेश बोरसे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या डागसौंदाना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. गौरवने आत्महत्या करून जीवन संपवण्यासारखा निर्णय का घेतला? असा प्रश्न आता महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. गौरवने आत्महत्या का केली त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधीलच गौरव राहत असलेल्या रुमच्या शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, गौरवने नैराश्यातून आत्महत्या केल्याची हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. गौरव हा KTHM महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून तो आपल्या सीए असलेल्या मामाकडे फावल्या वेळात काम करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हॉस्टेलमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस येताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. गौरव बोरसेने टोकाचे पाऊल उचलून जीवन यात्रा संपवल्याने बोरसे कुटुंबीयावर दु: खाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालय आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

Refinery Project : ठाकरे – फडणवीसांच्या चुकीनं राज्याचं होतयं रोज ५८ कोटींचं नुकसान

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : सासू-सुनेच्या भांडणाचा नवा अंक; ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version