spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बनावट लग्नच रॅकेट उद्धवस्त, आरोपी महिला मुलीची आई

बनावट लग्नच रॅकेट उद्धवस्त, आरोपी महिला मुलीची आई

मागच्या काही वर्षात राज्यातील अनेक ठिकाणी बनावट लग्न लावून दिल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस आलेले आहेत. बरेच गुन्हे दाखल केल्यानंतर या अश्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. यावेळेस ही घटना घडलीये ती बीड जिल्ह्यात, बनावट लग्न लावून तरुणांकडून ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अशे खोटे लग्न लावणारे रॅकेट अजूनही सक्रिय असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आलेले आहे. याप्रकरणी एका महिलेवर व तिच्यासोबतचे असणारे २ एजंट यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लग्न लावून फसवणूक करणारी महिला ही एका मुलीची आई आहे. कर्नाटक राज्यातील एका मुलीची आई असलेल्या महिलेने बीडच्या एका तरुणाशी विवाह करून तब्बल तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न होत नव्हते, त्यामुळे त्याने बीडमधीलच लग्न जमवणारे रामभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर रामभाऊ कुलकर्णी यांनी कर्नाटक राज्यातील बिदरच्या सुनिता नावाच्या महिलेशी या तरुणाची भेट घालून दिली. त्यानंतर दिव्या नावाच्या एका मुलीसोबत या तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं होतं.

मात्र लग्न लावण्यापूर्वी सुनीता हिने दिव्याच्या घरच्यांना ३ लाख रुपये द्यावे लागतील अशी अट घातली होती, त्यानंतर अटीनुसार २ लाख ८० हजार रुपये रामभाऊ कुलकर्णी यांच्याकडे दिले. विवाहाच्या एक महिन्यानंतर उर्वरित रक्कम त्यांना देण्यात आली होती. मात्र, लग्नाला एक महिना होताच दिव्या हिने बिदरला परत जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तरुणाला संशय आला आणि हे सर्व एक रॅकेट असल्याचे त्याननंतर उघडकीस आले असून दिव्याला एका नवऱ्यापासून मुलगी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

अशी केली जाते रॅकेट कडून फसवणूक
गेल्या काही वर्षात बनावट लग्न लावून लुबाडण्याचे प्रकार हे वाढले आहेत. राज्यातील अनेक भागातून अशे प्रकार बाहेर येत आहेत ज्यात खोटी बनावट लग्न लावणरं मोठे रॅकेट सक्रिय असून, संपूर्ण टोळी मिळून अशी फसवणूक करतात. अनेकदा यात मुलीचे खोटे आई-वडील दाखवून लग्न लावण्यात येते.

हे ही वाचा : 

अभिनेत्री Snehal Shidam ने घेतले दादरच्या भवानी मातेचे दर्शन | Navaratri Special Exclusive

नवरात्रीच्या उपवासात बनवा टेस्टी बटाट्यचे कबाब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss