जळगावातील शेतकरी संतप्त , केले हे कृत्य …

राज्यभरात पाऊस कमी पडल्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर मागच्या महिन्यापासून राज्यभरात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे.

जळगावातील शेतकरी संतप्त , केले हे कृत्य …

राज्यभरात पाऊस कमी पडल्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर मागच्या महिन्यापासून राज्यभरात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे सर्वच जिह्ल्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जळगावमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी कवडीमोल भाव मिळत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला केवळ पाच रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी संतापत झाले आहेत. जळगाव जिह्ल्यात मागच्या महिनाभरात पाऊस पडलाच नाही.

टोमॅटो, गिल्के, वांगी, दोडके, मिरच्या, गंगाफळ या भाज्यांना भाव न मिळाल्यामुळे शेकऱ्यानी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. भाज्यांची वाढलेली आवक आणि ग्राहक नसल्याने भाव पडल्याचं व्यापारी सांगत आहेत. गेल्या महिन्यानापासून जळगावमध्ये पाऊस पडला नाही. अश्या परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला. पण मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला कमी दर मिळाळ्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे. भाजीपाला कोणीही खरेदी करायला तयार नसल्यामुळे आणि भाजीला योग्य तो भाव येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी त्याचा संताप व्यक्त केला आहे.

भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे बाजारात मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.जळगाव बाजार समित्यांमध्ये किरकोळ बाजारातील सर्वच भाजीपाल्याची किंमत कमी झाली आहे. भाजीपाल्याचे दर निम्याहून कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. सगळ्या संकटाना सावरत शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे.

Exit mobile version