मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या रिवामध्ये (Madhya Pradesh Rewa Accident) भीषण अपघात झाला आहे. अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी (Madhya Pradesh 14 killed 35 injured) झाल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादहून गोरखपूरला जाणाऱ्या प्रवासी बसला हा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत. बस ट्रकला धडकून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीये.

मध्यप्रदेश- आणि उत्तरप्रदेशला जोडणाऱ्या नॅशनल हायवे ३० वर हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेली बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास रिवाजवळ हा अपघात झाला आहे. बसमधील सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होती. घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. पोलीसांच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ट्रॉलीने बसला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. रीवा येथील सुहागी पहाडी जवळ ही घटना घडली असल्याचं रिवाचे पोलिस अधिक्षक नवनीत भसीन यांनी म्हटलं आहे. तसंच, बसमध्ये असलेले सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे स्थानिक असल्याचं बोललं जातंय. जखमी असलेल्या ४० जणांपैकी २० जणांना प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. तसेच गाडीत नेमके किती प्रवासी होते, ते कुठले निवासी होते त्यांची नावे या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण गाडीत ५४ प्रवासी असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा :

राशी भविष्य – २२ ऑक्टोबर २०२२ – आजचा दिवस धनलाभाचा…

घरगुती पद्धतीने बनवा श्रीखंड आणि मोहनथाळ, जाणून घ्या रेसिपी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version