यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यवतमाळमध्ये (Yavatmal) रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कार अमरावतीकडे (Amravati) जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

अमरावतीवरून (Amravati) यवतमाळला येणाऱ्या एसटी ( क्रमांक, एमएच ०६ एस ८८२६) आणि टीयगो कार (क्रमांक, एमएच २९ बीसी ९१७३) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident) चार जणांचा मृत्यू झालाय. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम ) आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.

रविवारी (sunday) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. लग्न सोहळ्यावरून परत येत असताना काळाने घाला घातलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे ३ डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. या लग्नसोहळा अटोपून आज सकाळी यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे ही वाचा : 

वादग्रस्त वक्त्यवानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी

रिफायनरीबाबत राज ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version