spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात उष्मघाताचा पहिला बळी, शेतात काम करताना मजुराचा मृत्य

राज्यात निसर्गाची वेगळीच किमया अनुभवायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे उष्णेतेची तीव्र झळ सहन करावी लागत आहे. मुंबईतही तापमानात वाढ झालेली दिसून आली आहे. या उष्माघातामुळे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे.

राज्यात निसर्गाची वेगळीच किमया अनुभवायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे उष्णेतेची तीव्र झळ सहन करावी लागत आहे. मुंबईतही तापमानात वाढ झालेली दिसून आली आहे. या उष्माघातामुळे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. जळगावात शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावातील पाचोरा तालुक्यामधील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हा शेतमजूर शेतात काम करत असताना उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो शेतात खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम करून व जेसीबी चालवून आपलं कुटुंबीय चालवत होता. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्याचा संयुक्त कुटुंब परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

प्रेमसिंग सोबत असलेल्या दुसऱ्या मजूराने प्रेमसिंगची शुद्ध गेल्याने त्याला उठविण्यासाठी तोंडावर पाणी मारलं. परंतु तो काही हलत नव्हता त्याची हालचाल पूर्णतः थांबली होती. या घंटेनेनंतर शेतमजूर प्रेमसिंग याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्या नंतर यावेळी डॉक्टरांनी या शेतमजुराला मृत घोषित केले. या घटनेनंतर जळगाव जिल्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्टात अनेक भागात गारपीठांसह अवकाळी पाऊस बसतो आहे. यामुळे शेत पिकांचं मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय. यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचे दृश्य अवघा महाराष्ट्र अनुभवत असताना परिस्थितीच्या अगदी उलट घटना जळगावात घडली आहे. या उष्मघातामुळे एका शेतमजुराचा आपले प्राण गमवावे लागले आहे.


महाराष्ट्रातील कमाल तापमान एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उष्णता वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. तसेच दुपारी १२ ते दुपारी ०३ या दरम्यान घराबाहेर पडू नका, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

हे ही वाचा : 

“काका मला वाचवा” म्हणतं उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला – प्रवक्ते नरेश म्हस्के

दीपक केसरकरांनी दिला चंद्रकांत पाटलांना सल्ला

बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss