“पाकिस्तान जिंदाबाद” घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

“पाकिस्तान जिंदाबाद” घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबाद अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यामुद्दावर राजकारण तापू लागले असताना आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या त्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनीकडून म्हटले आहे.

पोलिस उपायुक्त सागर पाटील म्हणाले की, रस्ता अडवणे आणि दंगा घडविणे प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोशल मीडियावर उपलब्ध व्हिडिओमधून जे काही निष्पन्न होईल, त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.तपासातून जे काही निष्पन्न होईल त्यानुसार जे काही कलम असतील ते आम्ही समाविष्ट करणार आहोत. याबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून दोषींवर कारवाई होईल, असंही पाटील यांनी सांगितलं.पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणांचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा पोलिसांनी नमूद केली नाही.

प्रकरण काय?

दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात छापेमारी केली. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे जिल्ह्यात पीएफआयचे मुख्य कार्यालय आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यानंतरही आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना पीएफआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

हे ही वाचा:

चिनी लष्कराच्या बंडामुळे शी जिनपिंग नजरकैदेत असल्याच्या अफवांना आले उधाण

IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version