spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समृद्धी महामार्गावर परिवहन विभागाकडून मोफत टायर तपासणी केंद्र सुरू!

समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीसाठी बनवलेला मार्ग आहे.परंतु हा समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून रोजच अनेक अपघातांच्या घटना समोर येत आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीसाठी बनवलेला मार्ग आहे.परंतु हा समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून रोजच अनेक अपघातांच्या घटना समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिवहन विभागाकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. परिवहन विभागाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टायरची तपासणी करण्यासाठी टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्वाचा मार्ग असून सुरुवातीपासूनच विशेष चर्चेत आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाट्न हे वर्षभरापूर्वीच झाले आहे. तेव्हा पासूनच समृद्धी महामार्गावर अपघात होणे हे सत्र सुरु झाले आहे. तसेच गेल्याच महिन्यात २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले.परंतु या टप्प्यात ही अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच या टप्प्यात अपघात होऊन ३ जण मरण पावले आहेत. समृद्धी महामार्गाच्या अपघातांमध्ये टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे म्हणूनच शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गावर टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत.

हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर टायर तपासणी केंद्र हे शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर अशा दोन ठिकाणी उभारण्यात आले आहेत. आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर काल तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या तपासणी केंद्रावर टायर सोबतच वाहनांची देखील मोफत तपासणी केली जाणार आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा शिर्डी ते नागपूर तर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतूकीसाठी सुरू झाला आहे. समृध्दी महामार्गावरील अनेक अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत म्हणूनच अशा अपघातांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भिमानवार म्हणाले की, उपक्रमामार्फत वाहनधारकांना टायर तपासणी केंद्रावर नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर, चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहे.

हे ही वाचा:

World Test Championship Final चा चौथा दिवस परंतु आघाडी ऑस्ट्रेलियाकडेच

घरच्या घरी बनवा कोहळ्यापासून चविष्ट शिरा; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Father’s Day 2023: पितृदिनानिमित्त या ठिकाणी करा बाबांसोबत Time Spent

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss