Wednesday, October 2, 2024

Latest Posts

पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी, महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये!

पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल (बुधवार, २ ऑकटोबर) जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, “महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी १,४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आणि आभार व्यक्त केले आहेत.”

१४ पूरग्रस्त राज्यांना ५ हजार ८५८.६० कोटी तात्काळ जारी करण्यात आले आहेत. हे राज्य आपत्ती निवारण दल निधी (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल निधी (NDRF) कडून आगाऊ म्हणून येते.

१४ राज्यांमध्ये निधीचे वितरण खालीलप्रमाणे

  • महाराष्ट्र: ₹१४९२ कोटी
  • आंध्र प्रदेश: ₹१०३६ कोटी
  • आसाम: ₹७१६ कोटी
  • बिहार: ₹६५५.६० कोटी
  • गुजरात: ₹६०० कोटी
  • हिमाचल प्रदेश: ₹१८९.२० कोटी
  • केरळ: ₹१४५.६० कोटी
  • मणिपूर: ₹५० कोटी
  • मिझोराम: ₹२१.६० कोटी
  • नागालँड: ₹१९.२० कोटी
  • सिक्कीम: ₹ २३.६० कोटी
  • तेलंगणा: ₹४१६.८० कोटी
  • त्रिपुरा: ₹२५ कोटी
  • पश्चिम बंगाल: ₹४६८ कोटी

या वर्षी २१ राज्यांना १४ हजार ९५८ कोटी पेक्षा जास्त रक्कम आधीच जारी करण्यात आली आहे. यामध्ये खालीलप्रमाणे निधीचे वितरण समाविष्ट आहे.

  • SDRF कडून २१ राज्यांना ₹९०४४.८० कोटी
  • NDRF कडून १५ राज्यांना ₹४५२८.६६ कोटी
  • राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) मधून ११ राज्यांना ₹१३८५.४५ कोटी
  • इंटर-मिनिस्ट्रियल सेंट्रल टीम्स (IMCTs) च्या मूल्यांकन अहवालाच्या आधारे NDRF कडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
हे ही वाचा:

PM Narendra Modi, Amit Shah यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच: Nana Patole

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss