spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

G. N. Saibaba : अखेर प्रा. जी. एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता; कोर्ट म्हणाले…

माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (G.N. Saibaba) यांची मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला.

माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (G.N. Saibaba) यांची मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर साईबाबा आणि इतर आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते.

२०१७ मध्ये ट्रायल कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात साईबाबा (professor G.N. Saibaba) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव आणि अनिल पानसरे यांनी ही याचिका स्वीकारली होती. या प्रकरणी कोर्टाने आज साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच त्यांना तात्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. साईबाबा यांच्याशिवाय नागपूर खंडपीठाने अन्य पाच आरोपींनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं आहे. या पाचपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. या पाचही जणांवर अन्य कोणतीही केस नसेल तर त्यांना तात्काळ सोडून द्या, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

मार्च २०१७ मध्ये गडचिरोलीतील सेशन्स कोर्टाने साईबाबा यांच्यासह अन्य लोकांना दोषी ठरवले होते. त्यात एक पत्रकार आणइ जेएनयूमधील विद्यार्थीही होते. या सर्वांवर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आणि देशात अराजकता माजवण्याचा तसचे गद्दारीचा आरोप ठेवण्यात आला होता. कोर्टाने त्यांना अनेक कायद्यांतर्गत दोषी ठरवलं होतं. अनलॉफुल अँक्टिव्हिटीज (प्रिव्हेंन्शन) अँक्ट आणि आयपीसीच्या कलमांखाली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी प्रा. साईबाबा यांनी तुरुंगात आमरण उपोषण करण्याची धमकी दिली होती. तुरुंगात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. बाथरुम आणि शौचालयातील दृश्येही हे कॅमेरे टीपत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. साईबाबा यांच्या पत्नी आणि भावाने महाराष्ट्राच्या तत्कालिन गृहमंत्र्यांना पत्रंही लिहिलं होतं. हे सीसीटीव्ही हटवण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली होती. साईबाबा दिव्यांग असल्यामुळे त्यांना व्हिलचेअरवर राहावं लागत होतं. सध्या ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

काय आहे प्रकरण?

जी. एन. साईबाबा दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. वर्ष २०१३ मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या काहीजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबा हा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर गडचिरोली मध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबाच्या घरात झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे गोळा केले होते. त्यानंतर साईबाबाला अटक केली होती.

साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांचे आरोप होते. साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हे ही वाचा :

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss