spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जनाला गालबोट! ट्रॅक्टरखाली तीन बालकांचा मृत्यू, तर ६ जण जखमी

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Ganpati Visarjan 2024 : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूका निघाल्या असून गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गावातील एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला. ट्रॅक्टर पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीला काही अडखळा होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यासोबतच मिरवणुकीवेळी कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे. धुळ्यामधील घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने दारू प्यायली असल्याची माहिती समजत आहे. परंतु या निष्काळजीपणामुले चिमुकल्या गणेशभक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या दुर्घटने सहाजण जखमी झाले आहेत जखमींना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मध्य धुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत. संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Marathwada Mukti Sangram Day: मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील, काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss