spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धुळ्यातील प्रसिद्ध “खुनी गणपती” आहे हिंदू मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याच प्रतीक

Ganeshotsav 2024: धुळ्यातील प्रसिद्ध आणि मानाचा खुनी गणपती नांव ऐकून प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल पण हा धुळ्यातला मानाचा गणपतीला ऐतिहासिक महत्व असून खुनी गणपतीची ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा हि चक्क खुनी मशिदीजवळ होते. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी या गणपतीला फार महत्व आहे. ब्रिटिशकाळात गणेशोत्सवादरम्यान खुनी मशीद परिसरात झालेल्या वादाचे पर्यवसान पुढे हिंदू मुस्लिम ऐक्यात रूपांतरित झाले आणि त्यामुळेच धुळ्यातील या मानाच्या गणपतीला यामुळेच विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

काय आहे खुनी गणपतीचा इतिहास?

१८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले,अनेक जखमी झाले आणि आहिराणीत “त्या मशिदजवळ खून पडनात”, “खुन नी मसिद”, गणपतीना वकतले तथा खून पडनात”… या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं. त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने तब्बल ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता.

पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.

हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा

दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होत, बरोबर सायंकाळी ५ वाजता, म्हणजेच नमाजची अजान होतांना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते, मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो, तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते.एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मीयांनी ती आजतागायत जपलीय.

आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहित नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामूळे या इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. जसं १८९५-१८९६ मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की खुनी मशिद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तस जुन्या धुळ्याने हिंदूबहूल कॉलनीतली / पेठेतली लोकांनी मशिद पावित्र्याने जपलीय.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss