कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरस्तीचे कामे काल म्हणजेच २५ ऑगस्ट पासून सुरु झाले आहे. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू असून, हि कामे अधिक जलद गतीने होण्यसाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत दिल्या.
पावसाळय़ाची सुरुवात होताच मुंबई गोवा महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य दिसते. आणि हे साम्राज्य महिन्यापर्यंत कमी-अधिक प्रमाणात कायम असते. त्यामुळे खडय़ातून आदळत आपटत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच राहतो. दरवर्षी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होईल अशा वल्गना केल्या जातात. मात्र परिस्थिती सुधारत नाही आणि रस्त्याचे काम होत नाही याची प्रचीती सर्वानाच येते.

हेही वाचा : 

आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम, दोन तास वाहतूक बंद

कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई, ठाण्यासह उपनगरातूनकोकणवासीय गावागावांत जात असतात. त्यांच्या या प्रवासात दरवर्षी खड्डय़ांचे विघ्न उभे राहते. जुजबी डागडुजी सोडली तर रस्त्याची दुरुस्ती होतच नाही. महामार्गावरील पळस्पे, वडखळ ते इंदापूर या मार्गाचे रुंदीकरण २०११ साली सुरू झाले होते. हे काम २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२२ चा ऑगस्ट महिना सरत आला तरी रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

इंदापूर ते झाराप या पट्टय़ातील रस्त्याचे रुंदीकरण २०१४ साली सुरू झाले. हे काम २०१६ अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम २०२२ उजाडले तरी पूर्ण झाले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भाग सोडला तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. सामाजिक संस्था, पत्रकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाबाबत नाराजी लक्षात घेऊन अखेर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे.

गणपतीची 8 भिन्न नावे आणि त्यांचे अर्थ

काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे चिपळूणजवळ एका तरुणाचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली होती. आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी पुन्हा या रस्त्यावरुन सुरु होणार आहे. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ही २५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

या भारतीय शहरांमध्ये प्रथम सुरू करण्यात येणार 5G सेवा

Exit mobile version