spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात गणोशोत्सव, दिवाळीत 100 रुपयात आनंदाचा शिधा

राज्यातील गरीबांसाठी देखील एक महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला सरकारतर्फे गोरगरीबांना फक्त १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला. तसेच यावेळी राज्यातील गरीबांसाठी देखील एक महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला सरकारतर्फे गोरगरीबांना फक्त १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

गौरी गणपती आणि दिवाळीसाठी गोरररिबांना १०० रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. त्यात प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्यााचा समावेश असणार आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येणार आहे. सरकारकडून  लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

तसेच राज्यातील १७ जिल्ह्यांमधील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहे असा महत्वापूर्ण निर्णय आज घेण्यात आला. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी ५ हजार कोटींचा प्रस्ताव देखील सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. याआधीही राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शिधा वाटप करण्यात आले होते.  त्यावेळी लाखो लोकांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता. पण तो शिधा जनतेपर्यंत उशिरा पोहोचला होता. त्यामुळे सरकारवर विरोधकांनी टीका केली होती.

आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ देण्यात येणार आहे. तसेच आता दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे . मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देणयात आली आहे. सरकार लवकरच राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवणार आहे. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेतला. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. मंडणगड येथे लवकरच दिवाणी न्यायालय बांधण्यात येण्यात आहे. हे महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार, वनमंत्र्यांची माहिती

रस्त्यांवरील खड्डयांविरोधात मनसे कार्यकर्त्ये आक्रमक

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss