spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन, मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली नव्हती. मात्र यावेळी सर्व गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोणतीही निर्बंध नाहीत. त्यामुळे यंदा भव्य मिरवणूक काढत, वाजत गाजत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाईल. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक निघायला सुरुवात झाली आहे. बँन्ड, लेझिम यांच्यासोबत ढोलताशाच्या पथकाच्या हजेरी लालबागच्या राजाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते. लालबाग मार्केटमधून ही मिरवणूक निघते. भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, नागपाडा, सुतार गल्ली, माधवबाग, ऑपेरा हाऊस या मार्गे लालबागचा राजा गिरगाव चौपाटी असा प्रवास करत विसर्जनासाठी दाखल होतो.

हेही वाचा : 

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यानिमित्त राज्यभरात भव्य अशा विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात. मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात येतो. सकाळपासून साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एसअरपीएफ आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या टीम देखील तैनात असतील त्यासोबतच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत. ६०० हुन अधिक पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात मुंबईच्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.

त्याचबरोबर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.

पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर

मोठ्या उत्साहात, थाटामाटात आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएपच्या 8 तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मुलगी झाली भावूक म्हणाली, माझे वडील…

Latest Posts

Don't Miss