spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात , तरुणांच्या आनंदाचे रूपांतर वादात

गौतमी पाटील सध्या सतत चर्चेत आहे, तिच्या नृत्यावर, आदाकारीवर अनेक लोकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. त्यावर गौतमी पाटील हिने अनेकदा माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलेल आहे

गौतमी पाटील सध्या सतत चर्चेत आहे, तिच्या नृत्यावर, आदाकारीवर अनेक लोकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. त्यावर गौतमी पाटील हिने अनेकदा माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलेल आहे, परंतु तिच्या कार्यक्रमांवर त्याचा काहीच फरक पडलेला उलट कार्यक्रमात येणाऱ्यांची संख्या अधिका-अधिक वाढत आहे. असाच एक तुफान गर्दी असलेला कार्यक्रम नुकताच पार खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे पार पडला . वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त गौतमी पाटील हिला बोलावण्यात आले होते. गौतमी पाटील येणार म्हणून तरुणांची आधीच झुंबड उडाली होती . त्यानंतर गौतमी पाटील हिने आपली अदाकारी सुरु केली आणि लोक आनंदाच्या भरात नाचू लागली मग काय लोकांनी एकमेकांना अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली . ह्या कार्यक्रमासाठी लोक जवळपासच्या गावातून आलेली होती. कार्यक्रम संपला तशी हि तरुणाई निघायला लागली,पण कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा गाणं लावल्याने लोक पुन्हा स्टेज समोर येऊन धुडगूस घालायला लागली आणि ह्याचाच रूपांतर भांडण मध्ये झाल. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना ह्यात हस्तक्षेप करावा लागला.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला अनेक लोक विरोध करतात पण या उलट तिचा ज्या तालुक्यात कार्यक्रम असतो त्या तालुक्यात लोक तुफान गर्दी करतात आणि तिचे कार्यक्रम ठेवणारे लोक देखील बडे असामी असतात. तिने आतापर्यंत अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहे त्यापैकी अगदी हातावर मोजण्या इतक्याच कार्यक्रमात मध्ये गोंधळ उडाला नाही बाकीची सर्व ठिकाणी सारखीच गत आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांच्या वेळेस पोलिसांना तैनात राहावं लागत. हे राडे नवे नाही त्यामुळे गौतमी पाटील हिच्या एका कार्यक्रमात चक्क महिला हातात काठ्या घेऊन सुरक्षेसाठी उभ्या होत्या.

गौतमी पाटीलचा विडिओ वैराळ-
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या माणसाने तिचा कपडे बदलतानाचा विडिओ काढला आणि विरळ केला. त्यामुळे गौतमी पाटील हिचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी ह्या गोष्टीचा निषेध दर्शवला त्यांनी सोशल मीडियावर संस्कृती विसरू नका अशा पोस्ट देखील केल्या होत्या . ह्या विडिओ नंतर तिला विरोध करणाऱ्या लोकांनी देखील तिच्याबद्दल सहानभूती दर्शवली.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss