घ्या जाणून वेळापत्रक ; नागपूरवरुन सुटणार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या

नवरात्रोत्सवापासून सणासुदीला सुरुवात होते. आगामी दिवाळी, छट पूजन अशा विविध सणांमध्ये रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई मार्गावर चार 'फेस्टिव्हल स्पेशल' गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

घ्या जाणून वेळापत्रक ; नागपूरवरुन सुटणार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या

नवरात्रोत्सवापासून सणासुदीला सुरुवात होते. आगामी दिवाळी, छट पूजन अशा विविध सणांमध्ये रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई मार्गावर चार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाली असून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन तिकीट काउंटरवरुन बुकिंग करता येईल.

फेस्टिवल निम्मित विशेष ट्रेन्स सोडण्यात इयर आहे. त्या विशेष ट्रेनचे क्रमांक 01025, 01027, 01033/01034, 01031, 02105 आणि 01043 ची बुकिंग रविवारी, 25 सप्टेंबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर सुरु झाली आहे. वरील विशेष गाड्यांच्या विस्तृत थांबा आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES या अँपद्वारेही करता येईल.

दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या थांब्यांवर थांबणार आहे. या गाड्यांची रचना दोन डबे AC-2 टियर, 8 डबे AC-3 टियर, 4 डबे स्लीपर क्लास, 5 डबे सामान्य द्वितीय श्रेणी प्रमाणे राहील. ज्यामध्ये गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट (Mumbai Nagpur Special) विशेषः 01033 विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22 आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.32 वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूर-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट विशेषत: तसेच 01034 विशेष ट्रेन 23 आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूरवरुन (Nagpur) 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे- निलेश राणे

KBC 14 : नवरात्रीनिम्मित खेळाचे नियम बदलले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version