Girish Bapat यांचा संघ स्वयंसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास घ्या जाणून

राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट (Girish Bapat) हे नेहमीच चर्चेत असतात.

Girish Bapat यांचा संघ स्वयंसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास घ्या जाणून

राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट (Girish Bapat) हे नेहमीच चर्चेत असतात. गिरीश बापट यांनी आपल्या तब्बल ४ दशकांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे.

३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात गिरीश बापट यांचा जन्म झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर २ वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.

तसेच गिरीश बापट हे भारतीय राजकारणी आणि १७ व्या लोकसभेचे खासदार आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून पुणे, महाराष्ट्र येथून लोकसभेवर, भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आले. यापूर्वी ते अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकारमधील संसदीय कामकाज या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते ते १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते. १९९५ पासून सलग ५ निवडणुकांत ते कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. पुढे २०१४ मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, २०१९ मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version