spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Girish bapat, मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी, राजकीय क्षेत्रातातून हळहळ व्यक्त

आज सर्व राजकारणातला धक्का देणारी बातमी ही समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे.

आज सर्व राजकारणातला धक्का देणारी बातमी ही समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे. गिरीश बापट (Girish Bapat) हे राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी असलेले एक आहेत. ते नेहमीच चर्चेत असतात. गिरीश बापट यांनी आपल्या तब्बल ४ दशकांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मैत्री जपावी तर गिरीश बापट यांच्यासारखी – अंकुश काकडे

तसेच पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले आहे. महानगरपालिका, विधानसभा, राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेले काम, पुण्यातील विकासाचे योगदान कधीही विसरू शकत नाही. गिरीश बापट यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मैत्री असावी आणि जपावी तर गिरीश बापट यांच्या सारखी. त्यांच्या जाण्याने पुण्याने चांगला नेता गमावला असं म्हणत त्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

 सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले – शरद पवार

त्याच सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानू देखील ट्विट केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं,आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला – अजित पवार

“राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. १९९५ पासून २०१४ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. २०१९ ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

 एक संवेदनशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड – एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही गिरीश बापट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांनी ट्विट केले आहे. अनेक वर्षे माझ्यासोबत विधीमंडळात काम करणारे ज्येष्ठ नेते व विद्यमान खासदार गिरीशजी बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त दु:खदायी आहे. एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे एक संवेदनशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

हे ही वाचा : 

Girish Bapat यांची ‘ही’ वादग्रस्त विधानं गाजली होती महाराष्ट्रभर

Girish Bapat यांचा संघ स्वयंसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास घ्या जाणून

मोठी बातमी!, भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss