मनोज जरांगे यांच्यासोबत गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केली चर्चा

जालन्यातील मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation) आज १७ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आंदोलनासाठी बसले आहेत.

मनोज जरांगे  यांच्यासोबत गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केली चर्चा

जालन्यातील मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation) आज १७ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आंदोलनासाठी बसले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. काही जिह्ल्यानमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पण अजूनही मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. ‘ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ‘ अशी मनोज जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली आहे. राज्य सरकारने जरांगे यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये अनेक वाटाघाटी चालू आहेत. पण तरीसुद्धा मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार समोर पाच मागण्या केल्या आहेत. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घ्यावी पण मुख्यमंत्री अजूनही तिकडे गेले नाही. पण काल रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी अंतरवली गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या भेटीला येणार होते . पण अजून १० वाजले तरी ते आले नाहीत. आम्ही सरकारच्या शब्दाला डाग लागू दिला नाही . त्यांनी ३० दिवसाचा कालावधी मागितला आहे तो आम्ही दिला आहे. मी आता आमरण उपोषण नंतर मी साखळी उपोषण करणार आम्ही सरकारला वेठीस धरले नाही, सरकारने आम्हाला वेठीस धरले. आम्ही चांगले आणी वाईट बोलणार नाही. आले आणि नाही आले तरी आम्ही नाराज होणार नाही. एक महिना दिला आहे तो पर्यत आम्ही विचारणार नाही पण एक महिना झाला की प्रश्न विचारणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मीच सर्व पर्याय देतो, सरकार देत नाही. सोळा दिवस झाले तरी मेडिकल घेत असल्यामुळे बोलत आहे. आता आम्ही ठाम आहोत. आज मुख्यमंत्री यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

त्यानंतर गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्ट मंडळाची भेट घेतली. यांच्यात जवळपास तीन ते साडेतीन तास चर्चा करण्यात आली. उपोषणाचा 17 वा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन प्रतिसाद मिळाला आणि लाखो लोक त्यांना भेटून गेले. चर्चा समाधानकारक झाली. आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल. आम्ही तिघांनी त्यांच्या टीम सोबत चर्चा केली. आम्ही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आलो आहोत. मी दिल्ली वरून आलो आणि गिरीश महाजन मुंबईवरून आलो, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Exit mobile version