नाशिकमधील मालेगाव परिसरात गिरणा नदीला पूर

राज्यभरात मागील काही महिन्यात पावसाने दांडी मारली होती. पण सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली.

नाशिकमधील मालेगाव परिसरात गिरणा नदीला पूर

राज्यभरात मागील काही महिन्यात पावसाने दांडी मारली होती. पण सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाची सर्वच जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोमेजलेली पीक पुन्हा नव्याने उमलून आली आहेत. मागच्या दोन दिवसांपासून नाशिक जिह्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सगळीकडे पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. सततच्या पावसामुळे मालेगाव शहरातील मोसम (Mosma) आणि गिरणा (Girna) नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे मालेगाव परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे.

नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नदीच्या उगम क्षेत्रात पूर परिस्थिती निर्मण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चणकापूर, पुनंद आणि हरणबारी या तिन्ही मोठ्या धरणातून होणाऱ्या पाण्यातून मालेगाव परिसरात पूर परिस्थिती निर्मण झाली आहे. या पूर परिस्थिमुळे मालेगाव आणि आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सटाणा तालुक्यात पश्चिम पट्ट्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. त्यामुळे हरणबारी धरणातून (Haranbari Dam) मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. टाणा तालुक्यातील मुल्हेर ते शेवरा या दोन गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कळवण (Kalwan) तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्याकळवण (Kalwan) तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. नाशिकच्या सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या लक्षणीय वाढीमुळे सर्व नदींच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी आणि तांबडी नद्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

देवळा तालुक्यात ठिकठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मागच्या तीन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा करत असलेला शेतकरी वर्ग आता सुखावला आहे. गुरुवारसह शुक्रवारी देखील जोरदार पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे १० ते १५ टक्के शेतकऱ्यांना त्याची पीक वाचवण्यात यश आले आहे.

Exit mobile version