आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी दिला इशारा

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.

आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी दिला इशारा

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस साहेब आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये मराठा आरक्षण द्या. अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. अशीच दडपशाही जर सुरु राहिली तर आधी २ कोटी मराठा समाज एकत्र आला होता आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यावे, त्यासाठी ज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढलीआहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यापूर्वी ५७ लाख नोंदी सापडल्या होत्या. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, त्याचा आकडा ६३ लाखांवर पोहचला आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्या १ कोटी लोकांना मराठा आरक्षण दिले जाणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.

निवडणुकांमध्ये निवडूण येण्यासाठी तुम्हाला मराठे लागतात. पण यांच्या नेत्यावर कोणी काही बोललं की सगळे तुटून पडतात. पण तुझ्या नेत्याचेचं टांगा पलटी केल्यावर काय करणार?. गोरगरीब मराठ्यांची मुलं देखील मोठे झाली पाहिजे यासाठी मी लढत आहेत. तुम्हाला नेत्यापेक्षा जास्त जात महत्वाची पाहिजे. पण, जर तुमच्यासाठी नेता मोठा असेल तर जातीकडे येऊ नका,असे मनोज जरांगे म्हणाले. सत्ता आणि मराठा यांच्यातील काटा म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्याला कसं दूर करता येईल गुंतवा असे धोरण यांनी घेतले आहे. मला जेलमध्ये घातले तरी तिथेही आंदोलन करणार. जेलमधील मराठ्यांना आरक्षण शिकवेल. मुस्लिम, धनगर हे देखील सोबत घेईन. माझी मान कापली, तरी आता ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मला कोणतेही पद नको, मी आई-बापाला बाजूला केलं. या समाजाने मला आई-बापाची आठवण येऊ दिली नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासण्याचे काम करणारे ते आमदार कोण ?, काँग्रेस

झारखंडमध्ये बाईकर फर्नांडावर सात जणांकडून पतीसोबत असताना बलात्कार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version