spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Shinde यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल, 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत 18 सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे. मुख्यमंत्री  शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला आहे. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व जागतिक कृषी परिषदेने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

जागतिक कृषी परिषद (World Agriculture Forum) हे अन्न सुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठी अनोखे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा समावेश करते. यासाठी निवड देखील जुरी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते.

येत्या बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन लोदगा, जिल्हा लातूर यांनी केले असून 18 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा महत्त्वाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांनी पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.

Latest Posts

Don't Miss