spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आजपासून या राज्यात जीओ ५जी सेवा होणार सुरू, आकाश अंबानी कडून होणार लॉन्च

जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून ५जीसेवा आणि Jio True ५जी आधारित वाय-फाय सेवा सुरू केली आहे. चेन्नईमध्येही आज जिओ ५जी सेवा लॉन्च करण्यात आली आहे. यासह आता एकूण ६ शहरांमध्ये Jio ५जी सेवा सुरू झाली आहे. याआधी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये आपली ५जी सेवा सुरू केली आहे. आता Jio True 5G सेवा ६ शहरांमध्ये उपलब्ध आहे. जिओच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आधीच माहिती दिली होती. आकाश अंबानी यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात Jio True ५जी आणि Jio True ५जी पॉवर्ड वाय-फाय सेवा सुरू केली आहे.

या शहरांमध्ये राहणाऱ्या युजर्सनाही जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ मिळणार आहे.जीओ ची ५जी सेवा सध्या देशभरात उपलब्ध नसून टप्प्याटप्प्याने सेवेचा विस्तार केला जाणार आहे, असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीही श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 5जी सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. २०१५मध्येही जीओ ४जी लॉन्च करण्यापूर्वी मुकेश अंबानी श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात १ ऑक्टोबर रोजी ५जी सेवा लॉन्च करण्यात आली. ५जी लॉन्च करताना ते म्हणाले की, देशात आता ही सेवा सुरु झाली, सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल किंवा व्हिडीओ पाहण्यापुरते मर्यादित राहू नये. याचा उपयोग क्रांती आणण्यासाठी व्हायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात, देश अशा तंत्रज्ञानावर काम करेल ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर नेता येईल.

दरम्यान, एअरटेलने ८ शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. मात्र या सेवा अद्याप संपूर्ण शहरात उपलब्ध नाहीत. उलट त्या काही स्पॉट्सवरच लाइव्ह करण्यात आले आहेत. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्हाला ५जी सेवेचा अनुभव घेता येईल. यातच जिओने अद्याप ५जी रिचार्ज प्लॅन्सची घोषणा सध्या केली नसली तरी, जिओ आपल्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना अमर्यादित ५जी डेटा अॅक्सेस करण्याची संधी मिळेल.

 

हे ही वाचा:

मुंबईकरांना रेल्वे कडून अनोखे दिवाळी गिफ्ट !

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा! फसवणुकीपासून सुरक्षित रहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss