दिवाळीच्या खरेदसाठी जाताय? मग, मुंबई लोकलच्या मेगब्लॉकच वेळापत्रक एकदा पहाच…

त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपली खरेदी नीट पार पडावी आणि मेगाब्लॉकमुळे आपला खोळंबा होऊ नये तर मुंबई लोकलच्या मेगब्लॉकच हे वेळापत्रक एकदा पहाच:

दिवाळीच्या खरेदसाठी जाताय? मग, मुंबई लोकलच्या मेगब्लॉकच वेळापत्रक एकदा पहाच…

उद्या रविवार आणि रविवार म्हणजे सुट्टीचा वार. अनेकजण आपली राहिलेली, रखडलेली अनेक कामे याच दिवशी करतात. या महिन्याच्या शेवटी येणारी दिवाळी पाहता, बहुतेक मुंबईकर रविवारचं औचित्य साधून दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडतात. पण, मुंबई रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उद्या मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगब्लॉक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपली खरेदी नीट पार पडावी आणि मेगाब्लॉकमुळे आपला खोळंबा होऊ नये तर मुंबई लोकलच्या मेगब्लॉकच हे वेळापत्रक एकदा पहाच:

मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गांवर उद्या, १६ ऑक्टोबर रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ दरम्यान माटुंगा – ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल रेल्वे माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ट्रेन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:१० पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल ट्रेन ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल रेल्वे ट्रेन नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी (अप आणि डाउन) ला जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी ११:५ ते सायंकाळी ४:०५ पर्यंत बंद राहतील. (बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १० ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

हे ही वाचा:

APJ Abdul Kalam Birthday: आज एपीजे अब्दुल कलाम जयंती, वाचा भारताने मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

Diwali 2022 : दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version