Thursday, July 4, 2024

Latest Posts

वीकेंडसाठी घराबाहेर जात आहात ?, तर हि बातमी नक्की वाचा

श्रावण महिना सुरु झाला कि, सर्वांची सणांची लगबग सुरु होते आणि त्याचसोबत सुट्ट्यांची चाहूल देखील लागते. यावर्षी देखील अनेक सॅन एक सोबत असल्यामुळे सुट्ट्यादेखील अनेक आहेत. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारीदेखील सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी फिरायला जाण्यास पसंती दर्शवली आहे.

श्रावण महिना सुरु झाला कि, सर्वांची सणांची लगबग सुरु होते आणि त्याचसोबत सुट्ट्यांची चाहूल देखील लागते. यावर्षी देखील अनेक सॅन एक सोबत असल्यामुळे सुट्ट्यादेखील अनेक आहेत. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारीदेखील सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी फिरायला जाण्यास पसंती दर्शवली आहे. आपल्या गावाकडे किंवा पर्यटनस्थळी जाण्यास सर्वचजण पसंती दर्शवत आहेत. या आलेल्या सलग सुट्यांमुळे राष्ट्रीय महामार्गासह मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam on Mumbai Expressway) दिसून आली आहे. आज सकाळपासून मुंबई बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तसेच सकाळी वाशी टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसून आली.

शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर स्वातंत्र्यदिन आणि पारशी नवीन वर्ष अशा चार सुट्ट्या सलग लागून आल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग़ावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. पालघर, वसई-विरार, मुंबई ठाणे येथून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. या सर्वांचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे.

तर दुसरीकडे मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर देखील मोठी वाहतूक कोंडी दिसून आली आहे. खालापूर टोलनजीक सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग दिसून आली. त्याशिवाय वाशी टोल नाक्यावर ही मुंबई बाहेर जाण्यासाठी वाहनांच्या रांगा दिसून आल्या. पावसाळी वातावरण आणि सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने लोणावळा, पुणे, साताऱ्यातील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी अनेकांनी पसंती दिली. त्यामुळे सकाळी लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी लोणावळा बोगद्यातून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरून काही वेळेसाठी वाहतूक वळवली. काही वेळेसाठी मुंबईला जाणारी वाहने थांबवण्यात येत असल्याने या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. लोणावळ्या जवळ वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.

हे ही वाचा :-

मुख्यमंत्र्यांचा ठाण्यात होणार सत्कार; निवासस्थानापासून निघणार मिरवणूक

Latest Posts

Don't Miss