आज कोल्हापुरात ‘गोकुळ’ची सभा गाजणार; विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

आज कोल्हापुरात ‘गोकुळ’ची सभा गाजणार; विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

आज कोरोना काळानंतर आज तब्बल दोन वर्षांनी ‘गोकुळ’ची सभा होत आहे. त्यात गेल्या वर्षी संघात सत्तांतर झाले आहे. सत्तांतरानंतर संघातील विरोधकांकडून संघाच्या कारभारावर अधूनमधून टीका केली जात होती. त्यात विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडीक यांनी पत्रकार बैठका घेऊन संघाच्या कारभारावर आरोप केले आहेत. त्याला सत्तारूढ गटाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळे सभेपूर्वीच राजकारण तापले आहे. आतापर्यंत महाडीक यांच्याकडूनच पत्रकबाजी सुरू होती. अलीकडे त्यात माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनीही उडी घेतली आहे.

हेही वाचा : 

सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत, एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल

सभेला विरोधकांनीही हजेरी लावून प्रश्‍न विचारण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही ही सभा गांभीर्याने घेतली असून महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या या सभेच्या ठिकाणी वाहन पार्किंगलाही बंदी घातली आहे. याशिवाय हॉलसमोरील रस्त्यावरही वाहन लावता येणार नाही, अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. नोंदणी झालेल्या नवीन ४५० संस्था त्यावरून सुरु झालेले आरोप प्रत्यारोप या सभेतील कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. गोकुळमधील सत्तांतर आणि गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच होत असलेली सभा, या कालावधीमध्ये झालेले आरोप यामुळे उद्याची गोकुळची सभा वादळी होणार यात शंका नाही. कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये गोकुळची सभा होत आहे.

नोएडातील टॉवर पडल्यानंतर मुंबईतील अनधिकृत इमारतींच काय ?, किरीट सोमय्यांचा सवाल

पोलिसांकडून सभेसाठी जय्यत तयारी, कडेकोट बंदोबस्त

गोकुळच्या सभेची पार्श्वभूमी आणि आजवरचा इतिहास लक्षात घेता कोल्हापूर पोलिसांकडूनही या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनने सभा अत्यंत गांभीर्याने घेत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केलं आहे. महासैनिक दरबारमध्ये होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पार्किंगला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हॉल समोरील रस्त्यांवरील वाहने लावता येणार नाहीत. या संदर्भात पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

पुढील सप्टेंबर महिन्यात ८ दिवस बँका असणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

Exit mobile version