spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gold-Silver Price: दसऱ्या आधी सोन महागल, जाणून घ्या आजचं दर

शक्तीच्या उपासनेचा सण शारदीय नवरात्रीला चार दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. पुढील पाच दिवस दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १३८ रुपयांनी किरकोळ वाढला. तर चांदीच्या दरात आज २२४ रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रीत असं अचानक सोनं वाढल्याने सोने खरेदींकरांसाठी हा खुप मोठा फटका असणार.

हेही वाचा : 

Nilesh Rane : विनायक राऊतांच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर म्हणाले, औकातीत राहावं अन्यथा ठाकरेंची इज्जत,अब्रू…

आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर आहे ४६,४०० रुपये तर २४ कॅरेट साठी ५०,६२० रुपये आहे तर १० ग्रॅम चांदीचा दर ५६४ रुपये आहे. आता सोन्याचे बाजार तुम्ही घरबसल्या पाहू शकता, तेही काही सेकंदात. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट रेट्स पाहू शकता.

राशी भविष्य ३०सप्टेंबर २०२२, तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये नेमकं काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं.२२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९ % इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.२४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात. तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल.

हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

Latest Posts

Don't Miss