spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MHADA Lottery 2023 : खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं, ५ जानेवारीपासून नोंदणी सुरू

म्हाडाच्या (MHADA News) घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरी २०२२ च्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता सर्वांसाठीच आणखी सोप्पं होणार आहे. म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. गुरुवारी ५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

म्हाडासाठी एकदाच नोंदणी (MHADA Registration) करुन त्याच नोंदणीवर आता इतर कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरुपी नोंदणी (MHADA Latest News) सुरु होत आहे. येत्या ५ जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, म्हाडा (MHADA) सोडत प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. नव्या प्रक्रियेनुसार आता संगणकीय प्रणालीद्वारे सोडत केली जाणार आहे. त्यामुळे सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या पद्धतीमुळे आता म्हाडाकडे अर्ज करतानाच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. सोडतीपूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली जाईल. ही छाननी झाल्यावरच पात्रता निश्चिती केली जाणार आहे. जे अर्जदार छाननीत पात्र ठरतील तेच सोडत प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे घडामोडी वेगवान घडणार असून, सोडतीदरम्यान जे विजयी होतील त्यांना घरांचा ताबा तत्काळ मिळणार आहे.

म्हाडाचं घर मिळवण्यासाठी लाखो लोक अर्ज प्रक्रियेत सहभागी होतात. एकाच वेळी शेकडो अर्ज जमा झाल्यामुळे अनेक वेळा म्हाडाचा सर्व्हर डाऊन होतो. नोंदणी करताना अर्जदारांच्या अडचणी वाढतात. गेल्या सोडत प्रक्रियेदरम्यान म्हाडाच्या एका घरासाठी १० हून अधिक अर्ज आले होते. सध्या स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जात आहे. अर्ज सादर करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाल्यानं लोकांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, नव्या सॉफ्टवेअर प्रणाली प्रमाणे आता म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना काही बदलही करण्यात येणार आहेत. फ्रि प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, आता म्हाडाच्या लॉटरीसाठी फॉर्म भरताना काही कागदपत्रांची पूर्तता थोडी अर्ज भरणाऱ्यांना आधीच करावी लागणार आहे. याआधी लॉटरी लागल्यानंतर ज्या कागदपत्रांची पूर्तता लोकांना करावी लागत होती, ती कागदपत्रही लॉटरीचा फॉर्म भरतानाच मागवून घेतली जाणार आहेत. त्या धर्तीवरच अर्ज भरलेल्यांचे फॉर्म स्वीकारले किंवा नाकारले जातील. तसेच ऑनलाईन फॉर्म भरताना ओळखपत्र, पत्ता, उत्त्पन्नाचे कागदोपत्री पुरावे, जात प्रमाणपत्र, ज्या वर्गातून अर्ज भरावयाचा आहे, त्या विशेष प्रभागाचं सर्टिफिटेक ही सगळी कागदपत्र ऑनलाईन भरावी लागतील.

गुरुवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून नोंगणीस सुरुवात होईल. नोंदणी प्रक्रियेतील नव्या बदलामुळे आता नोंदणी करतावेळीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तताक करून ती सादर करावी लागणार आहेत. जसे की, पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला वगैरे. एखादा व्यक्ती जर सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील असेल तर त्याला त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

हे ही वाचा : 

Rishabh Pant साठी उर्वशी रौतेलाच्या आईने लिहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले…

“त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर” सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss