शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून महाराष्ट्रातून अखेर माघारी परतला

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून महाराष्ट्रातून अखेर माघारी परतला

जून महिनापासून महाराष्ट्र राज्यात मुक्काम ठोकून बसलेल्या मान्सूनने अखेर निरोप घेतला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. मान्सून परतल्याने दिवाळीत पाऊस नसेल. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. ह्या वर्षी मान्सूनमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच जनजीवन विस्कळीत झाल असून शेतकऱ्यांचही प्रचंड नुकसान झाल आहे.

यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांच्या तुलनेत या वर्षी राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही.

राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.. राज्याने गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यंदा अनुभवला. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा हि विक्रम मोडून मान्सून २३ ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. तसेच संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२३ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल २३ टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे. गेल्या ५० ते ६०वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा :

जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

टी-२० विश्वचषका आधी रोहित शर्माने घेतली पत्रकार परिषद; बी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version