spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; ८९ हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार २१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आज जारी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं ८९ हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी रुपयांची घोषणा सरकारनं केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी दिला जाईल.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या खर्चापोटी एसटी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.या निर्णयामुळं ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना थोडाफार आधार मिळाला आहे.

एसटी महामंडळानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडे ७३८.५० कोटींची मागणी केली होती. मात्र, राज्य सराकरकडून वित्त विभागाला प्रस्ताव पाठवल्यानंतर ३०० कोटी रोखीनं देण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबरच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दिवाळीच्या काळात एसटीला उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे. एसटीनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा :

रॉजर बिन्नी यांच्या जागी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया

दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याच्या प्रश्नावर पाकिस्थांचे मौन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss