सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – एकनाथ शिंदे

तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला तर अक्षरशः जीव देण्याची वेळ येत आहे. कारण एक तर शेतकरी वर्गाला पिकांचा योग्य भाव मिळत नाही आणि तर दुसरीकडे शेतकरी वर्गावर निसर्ग राजा सुद्धा कोपला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सुद्धा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका.

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – एकनाथ शिंदे

तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला तर अक्षरशः जीव देण्याची वेळ येत आहे. कारण एक तर शेतकरी वर्गाला पिकांचा योग्य भाव मिळत नाही आणि तर दुसरीकडे शेतकरी वर्गावर निसर्ग राजा सुद्धा कोपला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सुद्धा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही तुम्हला नुकसान भरपाई देणार अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अयोध्या दौऱ्यावरून येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये पाहणी केली. तर बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला. बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत ८ एप्रिल२०२३ रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर या निक्सनचे पंचनामे त्वरित काढून त्याची निक्सन भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्ने करू असं देखिल एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी. मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी. एस. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तर एकंदर हाती आलेल्या माहितीनुसार २४२ गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. नगर जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीठाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : 

उष्णतेवर मात करण्यासाठी ‘या’ टिप्सचा वापर तुमच्या मेकअपमध्ये नक्की करा

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version