नागपूर सोलर कंपनी स्फोट प्रकरणी सरकारची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी

नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथे असलेल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया (Nagpur Explosives Factory Blast) कंपनीत झालेल्या स्फोट अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे.

नागपूर सोलर कंपनी स्फोट प्रकरणी सरकारची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी

नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथे असलेल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया (Nagpur Explosives Factory Blast) कंपनीत झालेल्या स्फोट अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. या प्रकरणी आज राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मृतांच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी सरकार घेणार असल्याची घोषणा आज सरकारकडून विधिमंडळात करण्यात आल्या आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत घोषणा केली.

संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्त्रात्रे पुरवणाऱ्या तसेच सुमारे ३० देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या आयुध निर्माण कारखान्यात काही दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. या स्फोटाचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही चांगलंच गाजला आहे. त्यानंतर आज विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्यावतीने मदतीची घोषणा केली.

विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटले , मृतातील कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. आठ जणांच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळणार आहे. तर, एका कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळणार. मृतांमधील काही कामगार हे ESI मध्ये नसल्याने त्यांना पेन्शन मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली असल्याची माहिती खाडे यांनी सभागृहाला दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री निधीतून ५ लाख रुपयातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय, आणखी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

नाताळच्या सणासाठी घरच्या घरी बनवा स्पॉंजी रवा केक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version