दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यासह १०० हून अधिक गोविंदा जखमी तर, एकाचा मूत्यू

दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यासह १०० हून अधिक गोविंदा जखमी तर, एकाचा मूत्यू

काल राज्यात तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाख्यात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेक सण उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं नव्हतं. परंतु,यंदा राज्यातभरात मोठ्या जल्लोषात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. अनेक गोविंदां पथकांनी मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. आणि याप्रसंगी राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर केलं. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. असे यांनी सांगितले.

पण राज्यात काल दहीहंडी पथकांतील अनेक गोविंदा जखमीही झाले. काल दिवसभरात मुंबई आणि ठाणे मिळून एकूण १४८ गोविंदा जखमी झाले आहेत. तर, रत्नागिरीतील दापोलीमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाला.

“दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली” – एकनाथ शिंदे

वसंत लाया चौगले वय वर्षे ५५, दहीहंडी पथकात नाचतान वसंत चौगले चक्कर येऊन पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. मुख्यंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दहीहंडी उत्सवा दरम्यान, कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत.

काल दहीहंडी उत्सवा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर, राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना जखमी गोविदांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा : 

मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे ; अजित पवार

Exit mobile version