Monday, July 1, 2024

Latest Posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर गर्दी

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुक सुरु झाली असून कोकण पदवीधर मतदारसंघाच्या तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या प्रक्रियेस सकाळपासून सुरुवात झाली आहे.

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुक सुरु झाली असून कोकण पदवीधर मतदारसंघाच्या तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या प्रक्रियेस सकाळपासून सुरुवात झाली आहे. पाच जिल्हे आणि ५४ तालुके मिळून नाशिक शिक्षक मतदार संघ आहे एकूण ६९,३६८ शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजाविणारा आहे. शिवसेनेकडून किशोर दराडे हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार आहे. कोकण पदवीधर मतदार संघात मतदानाला सुरूवात झाली असून भाजपाचे निरंजन डावखरे विरूध्द काँग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडतेय यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे पाच जिल्ह्यात एकूण ९० मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून एकूण ६९,३६८ शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजाविणारा आहे पाच जिल्हे आणि ५४ तालुके मिळून नाशिक शिक्षक मतदार संघ आहे यंदाच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा नाशिक शिक्षक मतदार संघात बघायला मिळाला यात डमी उमेदवार देखील चर्चेत आले होते नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीत फूट पडली असून शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर दराडे हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे उमेदवारी करताय तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार आहे तर या सगळ्यांसमोर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे देखील आव्हान असणार आहे.

कोकण पदवीधर मतदार संघात मतदानाला सुरूवात झाली आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी मतदार करण्यासाठी मतदार दाखल झाले आहेत. नवी मुंबईत एकूण ११ हजार मतदार तर ठाणे जिल्ह्यात ९९ हजार मतदार आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे विरूध्द कॅाग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत आहे. नवी मुंबई मध्ये भाजपा नवी जिल्हाध्यक्ष संजीप नाईक यांनी मतदान केले असून निरंजन डावखरे यांचा तिसर्यांदा विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे. रत्नागिरी शहरातून मतदानाला प्रतिसाद मिळत आहे. पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. काॅग्रेस विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत दिसत आहे. काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत. निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडले गेले आहेत.

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss