spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांची मोठी कामगिरी, “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत ७४५ मुलांची सुटका

मुंबई : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने ( आरपीएफ) शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे जानेवारी 2022 ते जून 2022 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 490 मुले आणि 255 मुलींचा समावेश आहे. आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

भांडणामुळे किंवा कौटुंबिक समस्यांमुळे अल्पवयीन मुलं आपले घर सोडून शहरातील ग्लॅमरच्या शोधात येत असतात. त्यांना राहण्याचे ठिकाण नसते कुठेतरी आसरा मिळावा या अपेक्षेने सार्वजनिक मालमत्ता असलेले रेल्वे स्थानकावर येऊन ते आपला आसरा शोधतात. आणि अशी मुलं प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

हेही वाचा : 

नवे लक्ष्य मालिकेत दिसणार स्टार प्रवाहच्या मालिकांमधील पोलीस अधिकारी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक 381 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात 270 मुले आणि 111 मुलींचा समावेश आहे. तर भुसावळ विभागात 138 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात 72 मुले व 66 मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात 136 सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये 98 मुले आणि 38 मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागात सुटका केलेल्या 56 मुलांमध्ये 30 मुले आणि 26 मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात सुटका केलेल्या 34 मुलांची नोंद झाली असून त्यात 20 मुले व 14 मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुलींसह 971 मुलांची सुटका केली आहे.

Latest Posts

Don't Miss