नाशिक ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंनी दिले कारवाईचे आदेश

नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहेत. आता या संदर्भात दादा भुसे यांनी बैठक घेऊन आठ दिवसात निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंनी दिले कारवाईचे आदेश

नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहेत. आता या संदर्भात दादा भुसे यांनी बैठक घेऊन आठ दिवसात निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्स तस्करांना (Nashik Drug Case) लोकप्रतिनिधी फोन करतय का? त्याची चौकशी करा कारवाई करा. पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा, असे सांगत ड्रग्स प्रकरणी येत्या आठ दिवसात पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, असा सूचक इशारा दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला आहे. त्याचबरोबर शहर परिसरातील झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांनी नजर ठेवून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात ड्रग्जची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दादा भुसे यांनी दिले आहेत. यामागे कोणाचा वरदहस्त आहे का? कोणी फोन करतय का? पुण्यात देखील कोणी फोन केलाय का? तसेच पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा अशा सूचना पालक मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले ‘ पोलिसांनी या प्रकरणी थेट फिल्डवर उतरून कारवाई केली पाहिजे. असे झाले नाहीतर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच शहरातील ढाबे, झोपडपट्टी, पान टपरी अश्या ठिकणी बेकायदेशीर रित्या धंदे चालवले जातात. शहरातील हुक्का पार्लरवर (Hukkah Parlor) कारवाई करण्यात येईल. तसेच ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यासाठी नागरिकांना एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. या नंबर वरून नागरिक माहिती देऊ शकतात.

ड्रग्स प्रकरणी पोलिसांनी आता पोलिसांनी हेल्प लाईन नंबर तयार केला आहे. त्यांच्याद्वारे नागरिक माहिती देऊ शकतात. ६२६२२५६३६३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून देण्यात आले आहे. तसेच दादा भुसे बैठकीत म्हणाले ‘ ड्रग्स बाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, सामान्य नागरिकांना गुन्हेगारी ड्रग्स विषयी माहिती देता येईल. तसेच काही तक्रार असल्यास ८२६३९९८०६२ या तक्रार देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा असे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा: 

दोन देशातील वादाचा परिणाम विदर्भातील संत्रा उत्पादक शेती, संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा समलिंगी विवाह संदर्भाचा निकाल; विवाह करण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही, पण….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version