spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळीकरा पण फटाक्यांन शिवाय पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन

मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. फटाके न वाजवण्याबाबत सक्तीचे आदेश नाहीत. पण फटाके वाजवू नये असे आमचे आवाहन असल्याचेही त्यांनी म्हटले.

दिवाळीत मुंबईतील हवा प्रदूषणाच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली असताना दुसरीकडे आता राज्य सरकारने मुंबईकरांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाके न वाजविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईत सुद्धा फटाके न वाजवत दिवाळी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री म्हणून करत असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. फटाके न वाजवण्याबाबत सक्तीचे आदेश नाहीत. पण फटाके वाजवू नये असे आमचे आवाहन असल्याचेही त्यांनी म्हटले.

फराळ विक्रेत्यांना दिलासा…
दिवाळीत पदपथावर फराळ विक्री केली जाते. त्यासाठी स्टॉल टाकले जातात. त्यांच्यासाठी पाडव्यापर्यंत त्यांना स्टॉल लावून फराळ-पदार्थ विक्री करता येईल. त्यांना आम्ही परवानगी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाडाव्या नंतर या फराळ विक्रेत्यांनी आपले स्टॉल रस्त्यावरुन काढून टाकावे, अशी सूचना ही दीपक केसरकर यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंना टोला
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून शिवेसना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी
जेव्हा सदा सरवणकर तुमच्या सोबत असतात तेंव्हा योग्य असतात आणि दुसऱ्या सोबत गेल्यावर टीका करतात, असा सवाल केला. प्रभादेवीच्या सौंदर्यकरणासाठी 25 कोटी मंजूर केले, हे तुम्ही त्यांना दिले का? आम्ही जनतेसाठी काम करतो, असे सांगत सरवणकर सिद्धिविनायकचे भक्त आहे त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचेही केसरकर यांनी म्हटले. सरवणकर यांच्या नियुक्तीवरून त्यांची पोट दुखी होत असेल तर त्यांच्यासाठी पाटणकर काढा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा : 

शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss