spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jal Jeevan Mission व Swachh Bharat Mission ची अंमलबजावणी करण्याच्या Gulabrao Patil यांच्या सूचना

मुंबई (Mumbai) येथील मंत्रालयात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाच्या (Swachh Bharat Mission) आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात पाणी पुरवठा योजनांची अनेक कामे जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत सुरू आहे. या मिशनअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुले शौचालयांची कामे पूर्ण करावीत. जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) व स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले.

जल जीवन मिशनच्या सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याच्या सूचना करीत मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, सुधारित मान्यता देऊन या योजनांचे कार्यादेश देण्यात यावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा संकलनाची वाहने मागणीनुसार देण्यात यावी. कचरा विलगीकरण केंद्र (Waste Segregation Center), पर्यावरण अनुकूल कचरा प्रक्रिया केंद्राच्या कामांना गती द्यावी. ग्रामपंचायतींना 15 वा वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च झाला पाहिजे, याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात याव्यात. जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) प्रकल्पातील पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) असलेल्या मे. वॅपकॉस कंपनीने त्यांच्याकडील कामे पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले. सार्वजनिक कचराकुंडी (Public waste bins), घरगुती कचराकुंडी (Domestic waste bins), प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प (Plastic waste Management Projects), सांडपाणी व्यवस्थापन (Sewage management), मैलागाळ व्यवस्थापन (Sludge Management) या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे (Sanjay Khandare), राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे (Prashant Bhamare) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Congress चा आरक्षणविरोधी चेहरा समोर, Rahul Gandhi यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून CM Eknath Shinde यांची टीका

सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून PM Narendra Modi यांच्या नावाची नोंद, मणिपूर हिंसाचारावरून Jitendra Awhad संतप्त

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss