spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोशल मिडियावर व्हायरल, ३० एप्रिल पासून MPSC च्या परीक्षा

३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission-MPSC) गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची (Hall Ticket) टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल झाली आहे.

३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission-MPSC) गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची (Hall Ticket) टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल झाली आहे. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आले आहे अशी माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले होते. परंतु हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळाले आहे त्यामुळे डेटा सेक्युरिटीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक व्हायरल झाली आहे या घटनेची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी ही लिंक जनरेट केली? या बाबतीत एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक च्या संदर्भामध्ये सायबर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व व्हायरल झालेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि अजून बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे असा दावा देखील या व्हायरल लिकांवर करण्यात आला आहे.

लिंक व्हायरल झालेल्या प्रकरणी एमपीएससीने स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांच्या परीक्षेचे प्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. बाह्यलिंकद्वारे करून दिलेले प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर व्हायरल होत आहे अशी बाब निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या पेजवर व्हायरल झालेली प्रवेशप्रमाणपत्रे ओडून वगळता कोणत्याही उमेदवाराचा अन्य डेटा लीक झाला नाही. याबाबत तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या पेजवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा आणि त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा खोटा असून असा कोणताही डेटा किंवा प्रश्नप्रत्रिका लीक झालेली नाही.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss