‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत मुंबईकरांना वाटण्यात येणार ‘इतके’ तिरंगे

पंतप्रधानांनी देशवासियांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत मुंबईकरांना वाटण्यात येणार ‘इतके’ तिरंगे

मुंबई – काहीच दिवसांवर प्रजासत्ताक दिवस येऊन ठेपला आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानात पंतप्रधानांनी देशवासियांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभियानाला साथ मिळणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय.

हेही वाचा

रणवीर सिंगला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? – अबू आझमींचा सवाल

 

या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई महापालिकेने मुंबईकर आणि संस्थांना 50 लाख राष्ट्रीय ध्वज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देण्याचे आवाहन नागरिकांना केले. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले होते.

हेही वाचा

शिवसेना कोणाची? शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत डेडलाईन

 

तसेच ध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्हवर लेझर शो आयोजित करण्यात येणार आहे. शाळा, कार्यालये, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने येथे जनजागृती करण्याचे निर्देशही दिले आहेत.

 

Exit mobile version