Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात

Har Ghar Tiranga Abhiyan - संपूर्ण देशभरात ७५ व्या स्वतंत्रदिनाची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात

मुंबई :- Har Ghar Tiranga Abhiyan – संपूर्ण देशभरात ७५ व्या स्वतंत्रदिनाची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. यंदा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी आजपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM  Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विक्रीही करण्यात आली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै २०२२ मध्ये सरकारने या नियमात सुधारणा केली आणि त्यानंतर आता दिवस आणि रात्री सुद्धा राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:-

‘हर घर तिरंगा’ अभियानात भाजपाकडून तिरंग्याचा अपमान, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा आरोप

Exit mobile version