spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

कोल्हापूर जिल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याभोवती ईडीने आणखी एक फास आवळला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे.

कोल्हापूर जिल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याभोवती ईडीने आणखी एक फास आवळला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. आज सकाळी (११ मार्च) कागलमधील यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आज हसन मुश्रीफ हे निवासस्थानी येणार आहेत हे माहिती असल्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे समस्या घेऊन कागलमधील निवासस्थानी जमा झाले होते. मागील दोन महिन्यापासून तिसऱ्यांदा ईडीची कारवाई सुरु असल्याचे समजल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना प्रकर्षाने व्यक्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते संतापले आहेत. तसेच कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या एका महिलेला तिच्या भावना अनावर झाल्या ती म्हणाली की, किती यायचे या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायचं तरी काय, यांना आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा. त्यानंतर भैया माने यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले की, हे जे काही लोक आले आहेत ते समर्थक नाहीयेत तर ते सर्व लोक कामासाठी आले आहेत. हसन मुश्रीफ यांनी ट्विट केले की ईडी त्यांच्यावर कारवाई करते. आदींची बातमी त्यांना कशी समजते अशी विचारणहानी त्यांनी या वेळी केली आहे. पुढे ते म्हणाले की, हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. हसन मुश्रीफ यांनी कारखान्याच्या माध्यमातून १२०० जणांना काम दिले आहे आणि २००० जाणं अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. कागलतालुक्यामध्ये समुद्धी आली आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मागील दोन महिन्यापासून हसन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर आहेत. याआधी ११ जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती आणि २१ दिवसानंतर पुन्हा ईडीने अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर सुद्धा छापेमारी केली होती. ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ३५ कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा करण्यात आला आहे. याबरोबरच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये लगेच धाव घेतली आहे आणि याचिका दाखल केली आहे. याचिका केल्यानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे परंतु आजच्या कारवाईमुळे पुन्हा त्यांना ईडीने झटका दिला आहे.

हे ही वाचा : 

Shivjayanti 2023, शिवजयंतीनिमित्ताने जाणून घ्या शिवजयंतीचे महत्व

Shivjayanti 2023, जाणून घ्या कर्तृत्ववान शिवरायांच्या काही खास गोष्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss