पुण्यात पुन्हा जोरदार पावसाळा सुरवात; हवामान विभागाने म्हटले…

पुण्यात पुन्हा जोरदार पावसाळा सुरवात; हवामान विभागाने म्हटले…

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रला झोडपलं आहे. त्यात पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. विमान नगर, शास्त्री नगर, चंदन नगर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात सोमवारी १०५ मिलीमीटर पावसाची (pune rain) नोंद झाली. हा तीव्र स्वरुपाचा पाऊस होता. मात्र ही ढगफुटी नव्हती. उद्यापासून १९ ऑक्टोंबर राज्यभरातील पाऊस कमी होणार आहे आणि २२ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील ८५ टक्के भागातून पाऊस परतलेला असेल, असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलेलं आहे. पुण्यात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सोमवारी, रात्री केवळ सव्वा तासात रात्री ९:४५ ते ११:०० या कालावधीत ९० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या परिसरात देखील तीव्र स्वरुपाचा पाऊस होता. त्यामुळे पुणेकरांची दिवाळी पाण्यात जाणार का?असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र २२ ऑक्टोंबरपर्यंत हा परतीचा पाऊस थांबलेला असेल, असा दावा हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. पुण्यात आज संध्याकाळी देखील पाऊस असणार आहे. मात्र हा पाऊस कालच्याएवढा तीव्र नसेल. त्यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेऊनच दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडावे, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. कालच्या पावसाने पुणेकरांचं मोठं नुकसान झालं. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे लोट वाहत होते. मात्र आज, कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नाही तर दक्षिण भागावर ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात आर्द्रतेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आणि १७ ऑक्टोबरपासून पश्चिम-वायव्य दिशेच्या हालचालींसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं केलं; उद्धव ठाकरेंनी केला आरोप

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दिवाळी भेट रबी पिकांचा MSP वाढवण्यात आला,जाणून घ्या किती होणार फायदा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version